मांजरसुंबा घाटात तरुणाचा घातपात?

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

नेकनूर दि. 29 : येथील मांजरसुंबा घाटात बुलटेवर पडलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि.29) मृतदेह आढळून आला. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम असून हा घात आहे की, अपघात याचा तपास पोलीस करत आहे. घटनास्थळी नेकनूर व बीड ग्रामीणचे पोलीस दाखल झाले आहेत.

निलेश ढास (वय 27 रा.लिंबागणेश ता.बीड) या तरुणाचा मांजरसुंबा घाटात मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात आहे की, घातपात हे निष्पन्न झाले नसून मयत तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम आहे, मृतदेह बुलेट गाडीवर पडलेला होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी नेकनूर पोलीस स्टेशनचे सपोनि. लक्ष्मण केंद्रे , बीड ग्रामीणचे उपनिरीक्षक रोटे यांच्या सह दीपक खाडेकर, अमोल नवले, क्षिरसागर घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात आहे की, घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Tagged