केज न.पं.मध्ये काँग्रेस-जनविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र

केज नगर पंचायत निवडणूक 2022 न्यूज ऑफ द डे राजकारण

काँग्रेस -आघाडीच्या नेत्यांची घोषणा

केज : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत जनविकास परिवर्तन आघाडीला घवघवीत यश मिळाले. आघाडीला ८, काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस ५ तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळाली होती. त्यामुळे त्यामुळे सत्तास्थापनेचा चर्चेला उधाण आले होते आता या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. केज नगरपंचायतमध्ये आघाडी व काँग्रेस एकत्र येणार असून सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा काँग्रेस व आघाडीच्या नेत्यांनी केजमध्ये पत्रकार परिषदेत बुधवारी केली.

यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष हारून इनामदार, ज्येष्ठ नेते अंकुशराव इंगळे, काँग्रेसचे युवा नेते तथा माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, नगरसेवक पती पशुपतीनाथ दांगट आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जनविकास परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष हारून इनामदार म्हणाले, खासदार रजनी पाटील यांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी आणि पाटील हे आमच्याच गावचे या विचारातून आम्ही एकत्र आलो आलो आहोत. शहराच्या विकासासाठी आम्ही सक्षम नगराध्यक्ष देणार आहोत. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते अंकुशराव इंगळे म्हणाले, काँग्रेस आमच्यासाठी जवळचा पक्ष आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तसेच, काँग्रेसचे युवा नेते तथा माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील म्हणाले, शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल. तसेच राष्ट्रीय काँग्रेसचा जनविकास परिवर्तन आघाडीला पाठिंबा आहे. जनविकास परिवर्तन आघाडीचा ५ वर्ष नगराध्यक्ष तर काँग्रेसचा उपनगराध्यक्ष राहील अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. यावेळी आघाडी व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tagged