arrested criminal corona positive

गोव्याची दारु अंबाजोगाईत पोहचली!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

विदेशी दारुसह गुटखा जप्त; डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाची कारवाई

 अंबाजोगाई  दि.17 :  लॉकडाऊन उघडून महिना लोटला नाही तर गोव्याची दारु अंबाजोगाईत विक्रीस दाखलही झाली. शनिवारी (दि.17) रात्री डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाने गोव्याची दारु, गुटखा असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील अंबिकानगर येथे एका गोदामात अवैध दारु व गुटखा असल्याची माहिती डीवायएसपी सुनिल जायभाये यांना मिळाली. त्यांनी पथकाला पाठवून त्या ठिकाणी छापा मारला असता यावेळी वीस पोते गोवा गुटखा व तीस विदेशी दारुचे (गोवा विक्रीसाठी असलेली) आढळून आले. त्याची अंदाजे किंमत 2 लाख 64 हजार एवढी आहे. या प्रकरणी गणेश बिडवे, दिनेश बिडवे (रा.अंबाजोगाई) यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि.सावंत, पोह.शेख शफीक,नितीन आतकरे, गोपाल सपकाळ यांनी केली. या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Tagged