ईडीकडून मंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीला सुरुवात!

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

पहाटेच ईडी पोहचली नवाबांच्या घरी

मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ईडी (ED)च्या रडारवर असल्याचं दिसत आहे. ईडीचे पथक आज सकाळी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आणि त्यानंतर नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संबंधीत ही चौकशी केली जात आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सकाळी सात वाजता नवाब मलिक दाखल झाले आहेत आणि त्यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. सकाळी सात वाजल्यापासून ईडी कार्यालयात नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.

सकाळी पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक स्वत:हून ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.

Tagged