पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

मुंबई, दि. 1 : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी पंकजाताई मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्या अखेरीस पंकजाताई मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजाताई यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंकजाताई मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. त्या घरीच उपचार घेत आहेत. त्यांचा मुलगा आर्यमान यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. तेथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tagged