बीड जिल्हा : आजही 9 स्वॅब पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड : जिल्ह्यात शुक्रवारी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी 20 जण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती. शनिवारी सर्वाधिक 717 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्यामुळे सर्व जिल्हावासियांचे अहवालांकडे लक्ष लागलेले आहे. आजचे (दि.11) अहवाल प्राप्त झाले असून आणखी 9 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून आज 717 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज 286 अहवाल प्राप्त झाले असून 431 स्वॅब प्रलंबित आहेत. 269 निगेटिव्ह असून 8 अनिर्णित आहेत. 9 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.

बीड शहरातील कृ.उ.बा. समितीजवळ 32 वर्षीय महिला (भिवंडीहून आलेली), मिलीया कॉलेजजवळ 75 वर्षीय महिला, संभाजी नगर येथे 56 वर्षीय पुरुष, अजिजपुरा खंदक येथील 33 वर्षीय पुरुष (कोरोनाबाधिताच्या संपर्कात), राजीव नगर, धानोरा रोड येथे 28 वर्षीय पुरुष, पांडे गल्ली 30 वर्षीय पुरुष (कोरोनाबाधिताच्या संपर्कात), परळी येथील आझादनगरमधील 60 वर्षीय पुरुष (बँकेतील बाधिताच्या संपर्कात), गेवराई येथील मोमीनपुरा येथील 24 वर्षीय पुुरुष (कोरोनाबाधिताच्या संपर्कात), माजलगाव येथील जुन्या मोंढ्यातील 52 वर्षीय महिला (सांगलीहून आलेली) यांचा पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णात समावेश आहे.

रुग्ण नेमके कुठले प्रशासनाकडून आलेली यादी पहा…

Tagged