आयपीएस रश्मीता राव यांचा जुगार अड्ड्यावर छापा!

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड


अठरा आरोपी ताब्यात
बीड
दि.4 : कडा ते अहमदनगर रोडवरील वाघलूज शिवारात हॉटेल साई भक्तीमध्ये अशोक एकनाथ खकाळ याचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या अड्ड्यावर शुक्रवारी (दि.4) दुपारी चारच्या सुमारास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मिता राव यांनी छापा मारला. यावेळी 18 आरोपी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळून आले. यावेळी दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कडा ते अहमदनगर रोडवरील हॉटेल साई येथे छापा मारला. यावेळी 18 इसम गोलाकार बसून जन्ना मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळताना आढळून आले. यावेळी त्यांच्याकडून रोख 48 हजार 430 रुपये, जुगाराचे साहित्य व चार दुचाकी व हॉटेलमध्ये देशी-विदेशी मद्य 9 हजार 878 रुपये असा एकूण 2 लाख 53 हजार 308 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 18 आरोपी विरुद्ध आंभोरा पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीता राव, पोह.बालाजी दराडे, राजू वंजारे, दिलीप गित्ते, संजय टुले, महादेव बहिरवाळ, सखाराम घोलप, अविनाश घुंगट यांनी केली.

Tagged