हल्ल्यात मुलगी गंभीर
परळी : एका 50 वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. याच घटनेत महिलेची 16 वर्षीय मुलगी जखमी झाली. शहराजवळ असलेल्या आयेशा नगर भागात ही घटना शनिवारी (दि.26) घडली.
शेख मदिना शेख मंजीद असे मयत महिलेचे नाव आहे. तिची मुलगी मुस्कान ही हल्ल्यात जखमी झाल्याचे समजते. भर दिवसा आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याची घटना असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच परळी शहराजवळील एका गावात दोघांचा खून झाल्याची घटना होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा खून झाला असून ही तीन दिवसातील खूनाची दुसरी घटना असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.