‘त्या’ महिलेचा मृत्यू; पोलीस अधिक्षकांची ‘स्वाराती’कडे धाव

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

बागझरीचे विषबाधा प्रकरण

अंबाजोगाई : तालुक्यातील बागझरी येथील तीन बालकांचा विषबाधेमुळे आज (दि.26) सकाळी मृत्यू झाला होता. त्या मुलांच्या आईनेही येथील स्वाराती रूग्णालयात सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास प्राण सोडले आहेत. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी स्वाराती रूग्णालयाकडे धाव घेतली असून घटनेची चौकशी करत आहेत.

 भाग्यश्री काशीनाथ धारासुरे (वय 28 रा.बागझरी) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्यासह साधना (वय 6), श्रावणी (वय 4), नारायण (8 महिने) या मृत बालकांनी शुक्रवारी (दि.25) रात्री सोबत जेवणे केले व झोपल्या. परंतु सकाळी कोणीही उठले नसल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर शेतात गेलेले महिलेचे पती काशीनाथ दत्तू धारासुरे हे सकाळी आले. त्यानंतर त्यांनी पत्नीसह इतरांना अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन भावंडांच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण सोडले. दरम्यान, जेवणानंतर विषबाधा झाली असल्याचा संशय काशीनाथ धारासुरे यांनी व्यक्त केला होतो. परंतु, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलीस अधीक्षकांकडून चौकशी
या घटनेतील तीन बालकांच्या मृत्यूनंतर महिलेचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा हे स्वा.रा.ती. रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक सुनील जायभाय, शहरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, बर्दापूरचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक खरात हे उपस्थित होते.

Tagged