म्हाडा परीक्षेत डमी उमेदवार बसवणारा आरोपी बीड पोलिसांच्या ताब्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


बीड – पेपर फुटी, डमी उमेदवार या बाबतीत बीडचे नाव कमी व्हायला तयार नाही. आज (दि.11) बीडमध्ये अभिषेक भारत सावंत रा. आहेर चिंचोली(हमु शाहू नगर पाण्याच्या टाकीजवळ) यास शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता.

अभिषेक भारतराव सावंत ( वय 28 ह.मु शाहूनगर बीड, आहेरचिंचोली ता.बीड) याने त्याच्या जाग्यावर डमी उमेदवार बसवला होता. परीक्षाकेंद्रावर परीक्षेस गेल्यानंतर चुकीची स्वाक्षरी केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झाला. त्याच्याकडे अभिषेक सावंतचे पॅन, आधार कार्ड आढळले. नागपूरचे परिक्षा नियंत्रक दिलीप लामतुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी (दि.10) रात्री शिवाजीनगर पोलीस व नागपूर पोलिसांनी त्यास आहेरचिंचोली येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, शिवजीनगरचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे बाळराजे दराडे, शिवनाथ उबाळे, विष्णू चव्हाण, रवींद्र आघाव, सचिन आगलावे, चालक सानप व नागपूर पोलीस ठाण्याचे पोह.घोळवे, पोना.सुनील सरकटे यांनी केली.

Tagged