मृतवस्थेतील बिबट्या आढळला

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे

गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज (दि.११) बिबट्या दिसला पण तो मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

राक्षसभुवन शिवारातील एका ओढ्यात बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडला. परंतु, काहीच हालचाल करत नव्हता. अनेकांना फोन करून बोलावून घेतले. ते सर्वजण लाठ्याकाठ्या घेऊन ओढ्याच्या दिशेने धावले. अंदाज घेऊन तो काहीच हालचाल करत नसल्याने हिंमत दाखवत तरुण त्या दिशेने गेले असता तो मृतावस्थेत होता. याची गावात माहिती मिळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पहाण्यासाठी एकच गर्दी केली. परंतु या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला. यामागील कारण स्पष्ट झाले नाही. वन अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी धाव घेतली आहे.

Tagged