ACB TRAP

घरात लाच घेताना माजलगावचा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात

न्यूज ऑफ द डे बीड

बीडमध्ये एसीबीच्या पथकाची कारवाई

बीड : स्मशानभूमीचे बिल पास करण्यासाठी आठ हजाराची लाच घेतांना जि. प.बांधकाम विभागाचे उपअभियंता यास राहत्या घरी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.5) रात्री आठच्या सुमारास केली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

   नामदेव रामकीसन बहिर (वय 55) असे लाचखोर प्रभारी उप अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याकडे माजलगावचा शाखा अभियंता पदाचा मुळ पदभार आहे. त्याने तक्रारदारास स्मशानभूमीचे 12 लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी 8 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. आठ हजार रुपयांची लाच घेताना बहिर यांना त्यांच्या शहरातील संत तुकाराम नगर येथे राहत्या घरामध्ये रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टीमने केली.

Tagged