कालव्यात वाहून गेलेल्या महिलेचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


पैठण : तालुक्यातील तुळजापूर- विहामांडवा रस्त्यावरील डावा कालव्यामध्ये एक महिला वाहून गेली होती. सदरील महिलेचे चौथ्या दिवशी खालापुरी शिवारातील डावा कालव्यात मृतदेह आढळून आला.
रेखा अक्षय सोनवने (वय २१ रा.तुळजापूर ता.पैठण) ही महिला आपल्या कुटुंबासोबत शेतात काम करीत असताना पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतालगत असलेल्या डावा कालव्याकडे गेलो होती. पाणी घेत असताना कल गेल्याने ती कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. सदरील महिलेचा पैठण पोलिसाकडून शोध होत नसल्याने शनिवारी घटनास्थळावर संतप्त नातेवाईकांनी रस्तारोको करून आंदोलन केले होते. त्यानंतर रविवार रोजी सकाळी या महिलेचे प्रेत तीर्थपुरी शिवारातून पाण्यामध्ये वाहून आल्याची खबर मिळाली. त्यांनतर पैठण पोलीस ठाण्याचे जमादार सुधीर ओव्हळ व नातेवाइकांनी तीर्थपुरी येथे जाऊन सदरील मयत महिलेचे प्रेत ताब्यात घेतले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी तीर्थपुरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

Tagged