death

बीडमध्ये कोरोना कक्षात आणखी एकाचा मृत्यू

बीड

आज 23 अहवालांची प्रतिक्षा
बीड : मुंबईहून आलेल्या एका 32 वर्षीय व्यक्तीचा दोन वेळा स्वॅब घेतला. दोनवेळा अहवाल अनिर्णीत राहिल्याने रविवारी रात्री तिसर्‍यांदा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे.

मातकुळी (ता.आष्टी) येथील एक कुटूंब 31 मे रोजी मुंबईहून गावी आले होते. या कुटूंबाचा एका पॉझिटिव्ह रुग्णासोबत संपर्क आला होता. गावी येताच आरोग्य विभागाने पती-पत्नी व दोन मुलांना जिल्हा रुग्णालयात आणून स्वॅब घेतला. यात पुरुषाचा अहवाल अनिर्णीत तर इतर तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे पुन्हा 48 तासांनी त्या व्यक्तीचा स्वॅब घेतला त्याचा अहवाल देखील अनिर्णीत आला. रविवारी रात्रीही त्या व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर पहाटे मृत्यू झाला असून त्याच्या येणार्‍या अहवालाकडे आता लक्ष लागले आहे.
आज 23 अहवालांची प्रतिक्षा
आज जिल्ह्यातून 23 स्वॅब घेण्यात आले. यात बीडमधील 10, अंबाजोगाई 3, परळी 6 आणि गेवराईमधील 4 स्वॅबचा समावेश आहे. या सर्वांचा अहवाल रात्री उशिरा येईल, असे सांगण्यात आले.

Tagged