beed bus stand

लग्नाला जातांना महिलेचे बीड बसस्थानकातून अडीच लाखांचे दागिने चोरी!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.13 ः मैत्रीणीच्या मुलीच्या लग्नाला जात असताना महिलेने सोबत बॅगमध्ये दागिने घेतले. बीड बसस्थानकात आल्यानंतर कुणीतरी बॅगमधील दागिने चोरी केले. तब्बल अडीच लाख रुपयांचे दागिने चोरी गेले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनंदा प्रदिप सावंत (रा.आदर्शनगर, सिद्धी विनायक रेसिडेन्सी बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या मुलीच्या लग्नाला जाण्यासाठी मंगळवार, 9 मे रोजी सकाळी 9 वाजता त्या बीड बसस्थानकात पोहचल्या. यावेळी त्यांनी बॅगमध्ये सोबत सोन्याची दागिने आणले होते. बसस्थानकात अज्ञात चोरट्याने त्यांचे दागिने लंपास केले. बॅगमध्ये दागिने नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अडीच लाख रुपयांचे दागिने चोरी झाले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार हे करत आहेत.

बीड बसस्थानकासह मंगल
कार्यालयात सतत दागिने चोरी

शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत असणार्‍या बीड बसस्थानकात सतत चोरीच्या घटना घडत आहेत. येथील पोलीस चौकी शोभेची वस्तू बनली आहे. तसेच मंगल कार्यालयात लगनसराई सुरु असल्याने दागिने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.

Tagged