१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; २८ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

क्राईम बीड

परळी :

कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना परळी तालुक्यात मात्र अवैध धंद्यांनी थैमान घातले असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धर्मापुरी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत १२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर यामध्ये परळीसह बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील २४ प्रतिष्ठित जुगार्यांना अटक केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान परळी तालुक्यात लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्वच अवैध धंदे सर्रास सुरु होते. यामध्ये कोणतेही डिस्टन्स,तोंडाला मास्क आदींचा वापर झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्याचा उद्रेक आता कोरोना संसर्गजन्य रोगाच्या माध्यमातून सुरु झाला असल्याचे व्यक्त केले जात आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि रविवार १४ जून २०२० रोजी सायंकाळी ६.५० वा.च्या सुमारास अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील किनगाव रोडवर असलेल्या हॉटेल अनिकेतच्या बाजूस असलेल्या शेतात ४ ठिकाणी गोलाकार बसून पत्त्याचा जुगार सुरु असतानाच पथकातील बाळासाहेब फड,श्री घुले,श्री तागर,श्री सुरवसे,पठाण,श्री सावंत,श्री राऊत ,श्री डोंगरे ,शेख,शिनगारे,आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता नगदी रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य मोबाईलसह इतर साहित्य असा एकूण १२ लाख ८ हजर २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर रोहित बेंबरे सपोनि यांच्या फिर्यादीवरून आरोपी यांच्या विरुद्ध कलम १२/अ मुंबई जुगार कायदा प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात अली आहे. दरम्यान पळून गेलेल्या जुगाऱ्यांमध्ये नावाजलेले प्रतिष्ठित नागिरीक असून हे पळून गेले कि पळवून लावले अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged