टेम्पो-स्कार्पिओचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड


पाटोदा तालुक्यातील जाटनांदूर फाट्याजवळील घटना

सुनील जेधे । जाटनांदूर
दि.28 ः भरधाव टेम्पोने स्कार्पिओला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात स्कार्पिओ गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेे आहे. हा अपघात बुधवारी (दि.28) सांयकाळच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील जाटनांदूर फाट्याजवळ झाला.

बीडडकडून नगरकडे जाणार्‍या टेम्पोने (एमएच-21 बीएच-3820) नगरहून बीडकडे येणार्‍या स्कार्पिओला (एमएच-12, एफके-9010) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात स्कार्पिओ गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. मृतामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलीसांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दोन्ही वाहने रस्त्यावरच आडवी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही वाहने पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने बाजूला करत वाहतूक कोंडी सुरुळीत केली.

Tagged