कार अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई तालुक्यातील चनईजवळील घटना

अंबाजोगाई : वेगात असलेल्या कारची रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक झाली. या अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई शहराजवळील चनई परिसरात आज (दि.९) १ वाजण्याच्या सुमारास घडला.

डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते ही मयत डॉक्टरांची नावे आहेत. हे दोघे कारमधून (क्र. एम.एच. ४४ एस. ३९८३) अंबाजोगाईकडे येत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर गाडी आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह येथील स्वाराती रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

Tagged