लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर धाडसी दरोडा!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


12 लाखांच्या रोकडसह दागिने लंपास; चोरट्यांचे नेकनुर पोलिसांना आव्हान

नेकनुर दि.11 : नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा टाकत चोरट्याने रोख रक्कम सोन्याचे दागिने असा पंधरा ते वीस लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी (दि.11) सकाळी उघडकीस आली आहे. सतत घडणाऱ्या चोऱ्यामुळे चोरट्यांनी नेकनूर पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसते.

नेकनुर पोलीस ठाणे हद्दीतील तूका विप्र देवस्थान मंदिरावर दरोडा पडल्यानंतर चौसाळ्यासह नेकनूर शहरात चोरी व दरोड्याच्या घटना घडू लागल्या. नेकनूरचे सपोनि शेख मुस्तफा यांचा गुन्हेगाराबद्दल असलेला उदारमतवादी दृष्टिकोन जनतेच्या मुळावर येऊ लागल्याने कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे. गुन्हेगारांसाठी नेकनूर पोलीस ठाणे हद्द नंदनवन बनल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक भर म्हणून मांजरसुंबा- पाटोदा महामार्गावर असलेल्या लिंबागणेश येथील बसस्थानक परिसरातील बँकेत धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली.आला आहे. शनिवार मध्यरात्री लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजुने लोखंडी शिडीवरून चढून गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोडुन आत प्रवेश करत चोरट्याने स्ट्राॅंगरूम कटरने फोडले. व्यवस्थापक प्रणव कापसे यांनी सांगितले की, अंदाजे साडे बारा लाख रोख रक्कम व काही सोने चोरीला गेले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, शेख, पो.ह.सचिन डिडुळ, नवनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले. वरीष्ठांना माहिती दिली असुन घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेने धाव घेतली आहे. तसेच श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले आहे.

Tagged