बीड जिल्ह्यातील ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह

बीड


बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळून संपर्कात आलेले बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता देशमुख, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यांचे रात्री स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रेखावर यांनीच स्वतः दिली.
8 जून रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन केले होते. हे सर्व अधिकारी त्यांच्या जवळून संपर्कात आले होते. पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजताच जिल्हाधिकारी यांच्यासह इतर सर्वच अधिकाऱ्यांनी स्वतः ला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले होते

Tagged