केज : आई सोबत दुचाकीवर गावी जात असताना अचानक वीजांचा कडकडाट झाला. यामुळे भयभीत झाल्याने तरुणाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी स्लिप झाली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.29) सायंकाळच्या सुमारास घडली.
केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील आई आणि मुलगा दुचाकीवर केजवरून गावाकडे जात होते. दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास कुंबेफळ जवळ असताना विजेचा प्रचंड कडकडाट झाला. त्यामुळे घाबरून गेल्याने दुचाकी रस्त्यावर स्लीप झाली. यामध्ये श्रीनिवास तपसे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई जखमी असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.