shivraj shinh

उद्या मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार?

देश विदेश राजकारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवराजसिंह चौहान भोपाळला भेट देणार आहेत. भोपाळमध्ये शिवराजसिंह चौहान संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेऊन मंत्री मंडळाच्या नावांची यादी अंतिम करू शकतात.

दरम्यान, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गृहमंत्र्यांशी विशेष सल्ला घेतला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय, ज्योतिरादित्य सिंधिया तसेच अन्य जवळच्या लोकांना स्थान मिळेल, असे समजते.

Tagged