बुध्दीभ्रष्ट झालेल्या कंगनाचा बीड जिल्हा शिवसेनेने पुतळा जाळला

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

कंगनाने पाकीस्तानात जावे- खांडे, मुळूक

  बीड   : महाराष्ट्राच्या पावन भूमीत बाहेरुन आलेल्या आणि कलेच्या नावावर नंगानाच करत करोडो रुपये कमवणार्‍या कचकडीच्या बाहुल्यांनी मुंबईच्या सारख्या लाखो लोकांचे जीवनमान उंचावणार्‍या शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करुन अभिनेत्री कंगना राणावत हिने बुध्दीभ्रष्ट झाल्याचे सिध्द केले आहे. महाराष्ट्राची पाकव्याप्त काश्मीर सोबत तुलना करणार्‍या कंगना राणावतचा निषेध करत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तिच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रसंगी कंगना राणावत पाकीस्तानला जा अशा घोषणा देण्यात आल्या. 

      शिवसेना संपर्क कार्यालय नगर रोड बीड येथे करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि सचिन मुळूक म्हणाले की, स्वयंघोषित मोठी अभिनेत्री असल्याचा आव आणणार्‍या कंगना राणावत हिने आपल्या अकलेचे दिवाळे काढत मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज असं तिनं म्हटलं होतं. तसेच मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय असे सांगून महाराष्ट्रद्रोह केला आहे. कंगनाचाही एकही चित्रपट आम्ही प्रदर्शित होवू देणार नाही तसेच तिच्या एकाही चित्रपटाचे चित्रीकरण सुध्दा होवू देणार नाही असा इशारा देत मुंबई बाहेरच्या कोणीही एैर्यागैर्यानी येवून मुंबईला आणि महाराष्ट्राला नाव ठेवण्याचा प्रयत्न करु नये. मुंबईला नाव ठेवणे म्हणजेच महाराष्ट्र द्रोह असून अशा महाराष्ट्र द्रोह्यांना राज्यात राहण्याची गरज नसल्याचेही खांडे, मुळुक यांनी म्हटले. पुतळा दहन प्रसंगी किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, सुशिल पिंगळे, जिल्हा सचिव वैजीनाथ तांदळे, मशरु पठाण, नगरसेवक भीमराव वाघचौरे, रामसिंग टाक, राजेंद्र राऊत, रतन गुजर, कल्याण कवचट, महिला आघाडीच्या चंद्रकला बांगर, उप शहर हनुमान पांडे, युवा सेनेचे राहुल फरताळे, दिलीप भोसले, पांडूरंग गवते, सुदर्शन मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Tagged