corona

कोरोना बळींसह रूग्णांची संख्या वाढल्याने चिंता

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

रूग्णसंख्या शंभरवरून अडीचशेच्या घरात

बीड : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 8 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून शंभराच्या घरातील रूग्णसंख्येत वाढ होऊन अडीचशेच्या घरात गेली आहे. कोरोना बळींसह रूग्णांची संख्या वाढल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातून बुधवारी 3424 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.17) प्राप्त झाले, त्यामध्ये 224 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 3200 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 30, अंबाजोगाई 18, आष्टी 43, धारूर 8, गेवराई 28, केज 34, माजलगाव 6, परळी 20, पाटोदा 11, शिरूर 17, वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, 24 तासांत 8 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.

Tagged