ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.24 : तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तीन हजराची लाच घेताना गेवराई तालुक्यातील तलवाडा सज्ज्याच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) दुपारी बीड एसीबीने केली.

अमित नाना तरवरे (वय 32, तलाठी दैठण सज्जा, अतिरिक्त कार्यभार तलवडा सज्जा,ता. गेवराई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तीन हजराची लाच घेताना तरवरे यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) दुपारी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी यांनी केली.

Tagged