accedent

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.6 ः भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा बायपास येथे रविवारी (दि.6) रात्रीच्या सुमारास घडली.
नामदेव बापूराव मस्के (वय 40 रा.गोलंग्री ता.जि.बीड) असे मयताचे नाव आहे. नामदेव मस्के व वाल्मिक खवले ( वय 30रा.कानडी घाट ता.जि.बीड) हे दोघे दुचाकीवरुन (एमएच-20 सीके-9382) जात होते. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने (एचआर-56 बी-2344) त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये नामदेव मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाल्मिक खवले गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीसांनी धाव घेत खवले यांना रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले.

Tagged