sharma ashutosh

निशीद गायकवाडला प्रश्नपत्रिका पुरवणार्‍या शर्माला दिल्लीतून अटक

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

‘वडझरी पॅटर्न’शी होतं थेट कनेक्शन

आणखी एका पॅटर्नची पोलखोल होणार


बीड दि. 1 : अमरावतीचा निशीद रामहारी गायकवाड यास आरोग्य सेवा गट ‘क’ ची प्रश्नपत्रिका पुरविणारा आशुतोष वेदप्रीय शर्मा (वय 38, रा. ए/131 सेक्टर 2, रोहीणी अवंतिका दिल्ली 85) यास पुणे सायबर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. शर्मा याचे कनेक्शन थेट आरोग्य सेवेची परीक्षा घेणार्‍या ‘न्यासा’ कार्यालयात जाते असा संशय पोलीसांना आहे. बीडच्या ‘वडझरी पॅटर्न’च्या उमेदवारांना गट ‘क’ ची प्रश्नपत्रिका याच साखळीमार्फत पोहोच झालेली आहे.

बीडमधून वडझरी पॅटर्नच्या डॉ.राजेंद्र पांडुरंग सानप आणि संजय शाहुराव सानप याला गट ‘ड’ च्या प्रश्नपत्रिका फुटीमध्ये 20 डिसेंबर रोजी अटक केली होती. याशिवाय बीड जिल्ह्यातील उध्दव प्रल्हाद नागरगोजे, प्रशांत व्यंकट बडगीरे, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इतक्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांनी वेगवेगळ्या अधिकार्‍यांना आणि परीक्षा घेणार्‍या आयटी कंपन्यांमधील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात आपला सहभाग नोंदवलेला आहे.
आरोपी संजय सानप याच्या तपासणीत अमरावतीच्या निशीद रामहारी गायकवाड याने गट ‘क’ची प्रश्नपत्रिका पुरविल्याचे उघड झाले. निशीद गायकवाडला 28 डिसेंबर रोजी अटक केल्यानंतर त्याने आपणास ही प्रश्नपत्रिका आशुतोष वेदप्रीय शर्मा याने पुरविल्याची कबुली दिली. त्यानुसार पुणे सायबर पोलीसांनी शर्मा याच्या भोवती सापळा लावल्यानंतर त्यास दिल्लीतून अलगद उचलण्यात आले. शर्मा याने ही प्रश्नपत्रिका न्यासाच्या आधिकार्‍यांकडून मिळवली की अन्य कुठून याचा तपास पोलीस करीत आहेत.

कार्यारंभला मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष शर्मा याने 23 ऑक्टोबर रोजी दिल्ली-मुंबई विमानप्रवास करून मुंबई विमानतळावर सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास हजेरी लावलेली होती. येथून तो बायकार दुपारी दोनच्या सुमारास आळंदीत पोहोचला. आळंदीत वडझरी पॅटर्नच्या दलालांना त्याने प्रश्नपत्रिका दिली. तेथून आळंदीत थांबलेले काही डमी उमेदवार आणि नगर, बीडमध्ये थांबलेल्या उमेदवारांच्या हातात ही प्रश्नपत्रिका पडली. विशेष म्हणजे अटक केलेला निशाद आणि ‘वडझरी पॅटर्न’चा एक दलाल 20 ऑक्टोबर रोजी दिवसभर बीडमध्ये होते. आता वडझरी पॅटर्नशिवाय बीड जिल्ह्यातील आणखी एका पॅटर्नची देखील लवकरच पोलखोल होणार आहे. या पॅटर्नने देखील प्रश्नपत्रिका फोडत अनेक दलालांना पोसण्याचे काम केले आहे. अनेकजण यातून गब्बर होऊन त्यांनी प्लॉटींग व्यवसायाला अजगराप्रमाणे विळखा घातला आहे.
दरम्यान 2019-20 टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे याचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्यासह लातुर येथील मनोज डोंगरे यालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

वर्धा येथील आरोग्य सेवकही संशयाच्या फेर्‍यात
दरम्यान ‘वडझरी पॅटर्न’च्या साखळीची पोलखोल होत असताना आता वर्धा येथील एक आरोग्य सेवकही संशयाच्या फेर्‍यात अडकलेला आहे. वडझरी पॅटर्नशी निकटचा संबंध असलेला हा आरोग्य सेवक गेल्या अनेक दिवसांपासून नॉटरिचेबल आहे.

एमआयडीच्या परीक्षेतही वडझरी पॅटर्न?
एमआयडीसीने 2019 साली 14 विविध पदांच्या 565 जागेसाठी परीक्षा घेण्यात आली होती. 30 डिसेंबर रोजी या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यातही ‘वडझरी पॅटर्न’चे काही विद्यार्थी मेरिटमध्ये चमकल्याचे बोलले जातेय. पुणे सायबर पोलीसांनी मेरीट यादीवर एकदा नजर मारावी, अशी मागणी होत आहे.

गुन्ह्यातील कोणीच सुटणार नाही
प्रकरणाचा संपूर्ण तपास पुणे सायबर विभागाच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यामुळे घोटाळ्यातील प्रत्येक आरोपीला बेड्या पडल्याशिवाय नवट