crime

माजलगावात व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांसह पाच व्यापार्‍यांवर गुन्हा

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

सोशल डिस्टन्सिंगचे केले उल्लंघन


माजलगाव : शहरात विविध दुकानात खरेदीसाठी येणार्‍या लोकांची मोठी गर्दी करून मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षासह पाच दुकांनदारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही दुकानात गर्दी न करता अंतर राखून व मास्क लावून तसेच सॅनटायझर वापरून व्यवसाय करायचा या सूचना देऊन जिल्हाधिकारी यांनी दुकाने सुरू करावयास परवानगी दिलेली आहे. असे, असताना शहरातील अनेक कापड दुकानात या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून एका वेळेस 100-150 लोकांची गर्दी होत असते. याबाबत काही दुकानदार यांना यापूर्वी समज देऊन सोडून दिले होते. यानंतरही अनेक दुकानांत नियमांचे उल्लंघन होत असल्याने गुरुवारी सायंकाळी पोनि.बुधवंत, उपनिरीक्षक अविनाश राठोड, विजय थोटे, सुभाष शेटे, खिझर पाशा, भास्कर राऊत, विनायक अंकुशे, दिलीप सरवदे यांच्यासह पथकाने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांच्या संजय ड्रेसेस, कुमार ड्रेसेसचे रिखबचंद मुगदिया, समर्थ ड्रेसेसचे हनुमान शिंदे, जावेद तौफिक सिद्दीकी यांचे सैराट मोबाईल, दत्तात्रय गायकवाड यांचे पुना पावभाजी अशा पाच दुकांनदारांवर गर्दी करून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188, 269 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Tagged