सदस्यांचा औरंगाबाद व बीड जिल्ह्यांचा क्षेत्रपाहणी दौरा
बीड : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.निलीमा सरप (लखाडे) व प्रा.डॉ.गोविंद काळे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजासाठी 10 ते 12 सप्टेंबर, 2023 या कालावधीत औरंगाबाद व बीड या जिल्ह्यांतील विविध जातींच्या संदर्भात क्षेत्रपाहणीकरिता येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि.10 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6.00 वा. खाजगी वाहनाने बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सोमवार, दि.11 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वा. बीडहून माजलगावकडे रवाना. 10.30 वा शासकीय विश्रामगृह माजलगाव येथे आगमन. 11.00 वा. माजलगाव येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी (जायकोची वाडी, धर्मेवाडी). दुपारी 1.00 वा. माजलगावहून गेवराई, जि.बीडकडे रवाना. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह, गेवराई, जि.बीड येथे आगमन व भोजन. दुपारी 3.00 ते 4.00 विविध जातसमुहाच्या प्रतिनिधी तसेच संघटनांशी चर्चा व निवेदने स्वीकारणे. 4.00 ते 5.00 वा. गेवराई, जि.बीड येथील वायदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी (पाडळशिंगी, जिरेवाडी). सायंकाळी 06.30 वा. गेवराई, जि.बीड येथून पैठण, जि.औरंगाबादकडे रवाना. 7.30 वा. शासकीय विश्रामगृह पैठण, जि.औरंगाबाद येथे आगमन व मुक्काम. मंगळवार, दि.12 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 10.00 ते 10.30 वा. तहसिल कार्यालय, पैठण येथे वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा. 10.30 ते 11.30 वा. पैठण येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी (सोनवाडी, नानेगाव, एकतुनी व भोकरवाडी). 11.30 वा. शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे रवाना. दुपारी 12.00 वा. शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे आगमन. 12.00 ते 1.00 वा. विविध जातसमुहांच्या प्रतिनिधी तसेच संघटनांशी चर्चा व निवेदने स्वीकारणे. 1.00 ते 2.00 वा. राखीव. 2.30 ते 3.30 वा. औरंगाबादमधील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा. 4.00 ते 6.00 वा.) उपसंचालक (शिक्षण), औरंगाबाद विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद यांचेसोबत “पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती” बाबत आढावा बैठक. 2) शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जि.प. औरंगाबाद यांच्यासोबत “प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या इतर मागासवर्ग बिंदुनामावली व जिल्हा बदलीबाबत” बैठक व चर्चा. 3) सहाय्यक आयुक्त (मावक), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांचेसोबत बिंदुनामावली बाबत बैठक व चर्चा. 4) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, औरंगाबाद यांच्याशी बैठक व चर्चा. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृह, औरंगाबाद.