corona testing lab

बीड : स्वारातिकडून आलेल्या अहवालात 60 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

दिवसभरात आढळले 308 नवे रुग्ण

तीन दिवसात पाच शहरात 690 व्यापारी पॉझिटिव्ह

शिरूर, पाटोदा, धारूर, वडवणीतील व्यापार्‍यांच्याही अ‍ॅन्टीजेन टेस्ट होण्याची शक्यता

बीड, दि.20 : सायंकाळी अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री स्वाराति लॅबकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात 60 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात 308 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्हा प्रशासनाने या महिन्याच्या सुरुवातीलाच ‘सुपर स्प्रेडर’ शोधण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार गेवराई शहरापासून सुरुवात करण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज आणि आष्टी शहरातील व्यापार्‍याच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात थोडे थोडके नव्हे तर 690 व्यापारी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बीड जिल्हा एका मोठ्या संकटातून वाचला आहे. यापुर्वी बीडमध्ये 354 तर गेवराईत 50 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले होते.

स्वाराति लॅबकडून आलेल्या रुग्णांचा सविस्तर तपशील बातमीच्या सर्वात शेवटी पहा….

जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्यावर मर्यादा आली आहे. काल स्वाराति लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 39 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर आज 60 इतके पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही संख्या पाहीली तर त्रूात लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे.
आता पर्यत जिल्हा प्रशासनाने गेवराई, बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी शहरातील व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्या आहेत. आता धारूर, शिरूर, पाटोदा आणि वडवणी ही चार शहरेच अ‍ॅन्टीजेन टेस्टची राहीली आहेत. त्यामुळे पुढील 10 दिवसात या शहरातील व्यापार्‍यांच्याही अ‍ॅन्टीजेन टेस्ट होण्याची शक्यता आहे.
स्वाराति लॅबकडून आलेल्या रुग्णांचा सविस्तर तपशील बातमीच्या सर्वात शेवटी पहा….

परळीत सर्वाधिक रुग्ण आढळले
परळीत अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सर्वाधिक 272 रुग्ण आढळून आले आहेत. या ठिकाणी तीन दिवसात 5392 टेस्ट करण्यात आल्या. तर सर्वात कमी रुग्ण आष्टी शहरात आढळून आले. इथे तीन दिवसात 2193 टेस्ट करण्यात आल्या. त्यात 70 जण पॉझिटिव्ह आढळून आले. परळीत एसबीआय बँकेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झालेला होता. तेथे अजुनही पॉझिटिव्ह आढळणार्‍यांची संख्या वाढतीच आहे.

अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये तीन दिवसात पॉझिटिव्ह आलेले रुग्ण
अंबाजोगाई –121
आष्टी –70
केज – 65
माजलगाव – 162
परळी – 272
एकूण- 690

बीड जिल्हा कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 3549
कोरोना मुक्त 1754
एकूण मृत्यू- 79
उपचार सुरु- 1716
नव्याने दाखल 248 (अ‍ॅन्टीजेन टेस्ट रिपोर्ट)
नव्याने दाखल 60 (स्वाराती लॅब रिपोर्ट)

स्वाराति लॅबकडून आलेल्या रुग्णांचा सविस्तर तपशील खाली पहा…

1
2
3

Tagged