deadbody

‘त्या’ दोन मयतांचे स्वॅब निगेटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात beed civil hospital स्वॅब swab घेण्याल्यानंतर मयत झालेल्या दोन व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात cd dr.ashok thorat यांनी ही माहिती दिली आहे.

बीड तालुक्यातील एक हृदयविकार असलेली महिला आणि गेवराई येथील एक पुरुष जिल्हा रुग्णालयात बुधवारी दाखल झाले होते. महिलेस हृदयविकार होता. तर पुरुषास डेग्यूची लागण झालेली होती. त्याच्या फुप्फूसात पाणी देखील झाले होते. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांचा स्वॅब घेतला होता. त्यानंतर ते दोघेही मयत झाल्याने अहवालाकडे लक्ष लागले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Tagged