CORONA

बीड जिल्ह्यात पुन्हा 6 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि. 8 : आज बीड जिल्ह्यातून पाठविलेल्या 258 स्वॅबपैकी 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचं मीटर पुन्हा वाढले असून कोरोनाबाधीतांचा एकूण आकडा 199 झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात एकूण 6 जण पॉझिटिव्ह आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात एकूण 6 जण पॉझिटिव्ह आले आहे आहेत. संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या बीड तालुक्यातील एका महिलेचा आणि गेवराईमधील एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान या दोघांचेही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. बीडच्या महिलेचा हृदयविकाराने तर गेवराईच्या पुरुषाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई येथील देशपांडे गल्लीतील 55 वर्षीय एक फिरता व्यवसायिक, सातपुते गल्लीतील 28 वर्षीय पुरुष, धारूर येथील अशोक नगरमधील 70 वर्षीय महिला, परळी येथील एसबीआय बँकेतील 60 वर्षीय कर्मचारी, गेवराई तालुक्यतील उमापूर येथील 34 वर्षीय पुरुष, तर बीड शहरातील काळे गल्लीतील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

लॉकडाऊन बाबतच्या निर्णयाला उशीर होणार
दरम्यान आज येणार्‍या रिपोर्टनंतर जिल्हा प्रशासन लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे या निर्णयाला रात्री उशीर होणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांचे अधिकृत स्वीय सहायक प्रशांत जोशी यांनी माध्यमांना दिली आहे.

अशी आहे जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी
9 जुलैपर्यंतची रुग्णांची नोंद – 199
मयत रुग्ण 07
बरे झालेले रुग्ण 130
उपचार सुरु असलेले 52