corona

बीड जिल्हा : 303 पॉझिटिव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.17) 303 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाकडे आज 3 हजार 348 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 3 हजार 45 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 20, आष्टी 15, बीड 57, धारूर 51, गेवराई 17, केज 24, माजलगाव 12, परळी 20, पाटोदा 61, शिरुर 11, वडवणी 15 असे एकूण 303 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या आकड्यात भर पडली आहेत.

Tagged