बीड, दि.22: महाराष्ट्राच्या राजकारणात आता कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आमदारांबरोबरच आता कोरोनाने देखील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचं यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या सुत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांची अॅन्टीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली ती मात्र निगेटीव्ह आली आहे. परंतु आता सेकंड ओपेनियन म्हणून आणखी एकदा आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल आणि त्यानंतर त्याबाबतचा निर्णय होईल असे सुत्रांकडून सांगण्यात आले.