imtiyaz jalil

1 तारखेपासून मंदिर उघडा; दोन तारखेपासून मशिदी – खा. इम्तियाज जलील

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे मराठवाडा

औरंगाबाद, दि.26 : एक तारखेला हिंदू बांधवांचा गणेश विसर्जनाचा दिवस आहे. त्या दिवशी राज्यातील सगळी मंदिरं उघडा. तर दोन तारखेपासून मस्जिदी उघडा. सरकारने आमची ही मागणी ऐकली नाही तर आम्ही स्वतःहून मस्जिदी उघडू, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

जलील म्हणाले, करोना संकटात लॉकडाउन मध्ये सर्व प्रार्थनास्थळं बंद आहेत. इतर गोष्टींवरील निर्बंध कमी होत असताना प्रार्थनास्थळं पुन्हा उघडण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी वारंवार होत आहे. सरकारने विरोध केला तरी 2 सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार आहे. आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत.

काही योग्य तर्क असतील तर ऐकून घेऊ अन्यथा परवानगी दिली नाही तरी 2 तारखेपासून सर्व मशिदी उघडू. याची सुरुवात आपण औरंगाबादमधून करणार असा इशाराही खा.जलील यांनी दिला आहे. ते एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.