bandu jadhav parbhani

परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा

मराठवाडा राजकारण

स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीसोबतचा वाद चव्हाट्यावर

परभणी, दि.26 : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला असून राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
जाधव यांच्या राजीनामास्त्राने राज्याच्या महाविकास आघाडीवर देखील परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tagged