tukaram mundhe

तुकाराम मुंढे यांची नागपुरहून बदली

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र विदर्भ

मुंबई, दि.26 : वादाच्या केंद्रस्थानी असणारे नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने बदली केली असून त्याच्या जागी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात महापालिकेत नेहमीच वाद उत्पन्न झालेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केंद्रसरकारकडे मुंढे यांची तक्रार केली होती. सहा महिन्यांच्या आतच त्यांना नागपूर सोडण्याची वेळ आली आहे. मुंढे यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीतील ही 14 वी बदली आहे. मुंढे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नवीन नियुक्ती मिळाली आहे.

मुंढे यांच्याबरोबरच राज्य सरकाने इतरही अनेक महत्वाच्या पदावरील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात कैलास जाधव यांना नाशिकचे पालिका आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली आहे. एस. एस. पाटील यांना सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. अविनाश ढाकणे यांची परिवहन आयुक्त आणि डॉ. एन. बी. गिते यांना महावितरणे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. सी. के. डांगे यांची बदली संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे येथे करण्यात आली आहे.

Tagged