court

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास दहा वर्षे सक्तमजुरी

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमास येथील अप्पर सत्र न्यायाधीश एस.एस. सापटणेकर यांनी दोषी ठवरिले आहे. त्याला न्यायालयाने सोमवारी १० वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला.

अशोक मारुती सरवदे (रा. साबळा, ता. केज) असे आरोपीचे नाव आहे. त्याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दि.२८ सप्टेंबर २०२० रोजी गु.र.नं. ४०५/२०२०, कलम ३६३, ३७६, ३७६ (J) (n) भा.द.वी सहकलम ४,६,८,१० बा. लैं. अ.प्र. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर आरोपीस न्यायालयाने जामीन दिला. त्याने जमानतीवर सुटल्यावर देखील पुन्हा पीडितेस फोन करून लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवून गेला आणि मुलगी अल्पवयीन आहे हे ज्ञात असूनही अत्याचार केला. विशेष बाब म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीस कारागृहात ठेवूनच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस १० वर्ष व ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.आर.एम. ढेले, ॲड.नितीन पुजदेकर यांनी मदत केली. तसेच पोलीस पैरवी म्हणून पो.कॉ.बाबुराव सोडगीर, पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहिले.

Tagged