atyachar

परळीत नर्सवर अत्याचार करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल
परळी
दि.11 : माझा नाद सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणत नर्सला मारहाण करुन मुलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना परळी शहरात घडली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पवार (रा.कंडक्टर कॉलनी, परळी) असे आरोपीचे नाव आहे. येथील एका खाजगीर रुग्णालयात 26 वर्षीय महिला नर्सची नौकरी करते. तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संजय पवार याने 23 ऑगस्ट 2019 ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत सतत इच्छेविरिद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच गेल्या तीन दिवसापूर्वी दुपारी 12 :30 च्या दरम्यान राहत्याघरी येऊन धमकी दिली व म्हणला की तू माझा नाद सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणत मला चापटाने मारहाण केली. तसेच तुला व तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन संभाजी नगर पोलीस ठाण्यात पवार विरोधात तक्रार दिल्यानंतर गु.र.न.122/2021 कलम 376, 376(2)(एन), 323,506 भदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.

Tagged