बीड : जिल्ह्यातील नरेगा घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची तातडीने बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने राधाबिनोद शर्मा यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून आज (दि.११) नियुक्ती केली आहे.
राधाबिनोद अरिबम शर्मा हे हिंगोलीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांना आता बीडचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी निर्गमित केले आहेत. दरम्यान, नरेगा प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकाऱ्यांवर थेट बदलीची कारवाई केल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.