अंगावर वार, चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून विदृप केलेला इसमाचा मृतदेह आढळला

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

अंमळनेर  दि.30 : एका 40 ते 50 वर्षीय इसमाच्या अंगावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विदृप करण्यात आला आहे. सदरील मृतदेह डोंगरकिन्ही परिसरात बुधवारी (दि.30) आढळून आला आहे. सदरील मयताची ओळख पटलेली नसून हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज अंमळनेर पोलीसांनी व्यक्त केला असून पुढील तपास पोलीस करत ओहत.
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरकिन्ही येथील गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी एका इसमाचा मृतदेह आढळून आला. सदरील मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत अंमळनेर येथील पेट्रोलपंपासमोर अरुण पोकळे यांच्या शेताशेजारी झुडूपामध्ये पडलेला होता. याची माहिती अंमळनेर पोलीसांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदरील प्रेत हे तीन दिवसापूर्वीचे असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी इसमाच्या चेहर्‍यावर केमिकल टाकुन चेहरा विदृप करण्यात आला आहे. मयताच्या डोक्यावर, गळ्यावर गंभिरस्वरुपाचे वार असून खून करुन चेहरा अ‍ॅसिडने जाळला असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. मयताची ओळख पटलेली नसून अंमळनेर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tagged