पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ट्वीट करून त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

  कोरोनाचा संसर्ग होऊन अनेकांचं निधन झालं. अशा ठिकाणी पंकजा मुंडे यांनी भेटी देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या होम आयसोलेशनमध्ये देखील होत्या. त्यांना लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्या पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Tagged