acb office beed

लाच घेताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष नरवडे व पुरवठा अधिकारी जाळ्यात

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव :

मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांना शुक्रवारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले.


-येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे याने तहसील कार्यालयात दिली होती.याची चौकशी पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांच्याकडे होती. या प्रकरणात नरवडे याने पैशाची मागणी केली व त्यात मध्यस्थी कुंभार यांनी केली, शुक्रवारी दुपारी एक च्या दरम्यान कुंभार यांच्या राहत्या घरी एक लाख रुपयांची मागणी केली होती ती रक्कम घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख भारतकुमार राऊत यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Tagged