accident

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

केज शहरातील घटना

केज : भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य झाला.

केज -अंबाजोगाई रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवारी सायंकाळी १० वाजता हा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश संतराम कावळे (रा. परळी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांना अपघातानंतर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु जागीच मृत्यू झालेला होता, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Tagged