बीडच्या पुरवठा विभागातून ५ हजार शिधापत्रिका गायब

न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

बीड : येथील जिल्हा पुरवठा विभागातून तब्बल पाच हजार शिधापत्रिका गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मंगळवारी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

काय वादात असलेला जिल्हा पुरवठा विभाग आता नवीन कारणाने चर्चेत आला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याच अनुषंगाने माहिती घेतली असता तब्बल पाच हजार शिधापत्रिका गायब झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सागरे यांच्या निदर्शनास आली. हा प्रकार त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना कळविला. त्यानंतर याप्रकरणी ठोंबरे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू, शिधापत्रिका दाखवून हे प्रकरण आपसात मिटविण्याच्या हालचाली पुरवठा विभागातील अधिकारी -कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tagged