RAHUL REKHAWAR

बाहेरून आलेल्या व्यक्तींना आता संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे नवे आदेश

.
बीड, दि.3 : कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आणि बाहेरून येणार्‍या लोकांचा वाढलेला धोका पाहून आता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. आतापर्यंत बाहेरून आलेल्या व्यक्तींसाठी होम क्वारंटाईन करण्याची पध्दत होती. मात्र ती पध्दत चुकल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

त्यानुसार खूप जास्त संसर्ग झालेल्या व्यक्तींना बीड शहरातील लॉ कॉलेज, अंबाजोगाईत टी.बी.गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय वस्तीगृह, परळीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह, गेवराईत र.भा. अट्टल महाविद्यालय, माजलगावात सिंध्देश्वर प्राथमिक विद्यालय, धारूरमध्ये समग्र शिक्षा अभियान मुलींचे वसतीगृह, आष्टीत पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, पाटोद्यात पीव्हीपी विद्यालयाचे मुलींचे वसतीगृह, शिरूर येथे कालिका देवी हायस्कूल, केज येथे शारदा इंग्लिश स्कूल तर वडवणीतील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्वारंटाईन केले जाणार आहे.

तर बीड जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेले लो रिस्क मधील व्यक्तींना बीड येथील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालय, अंबाजोगाईत कृषि महाविद्यालय वसतीगृह, परळीत पंचायत समिती कर्मचारी इमारत क्र.1, गेवराईत सेंट झेवियर्स स्कूल, माजलगावात सुंदरराव सोळंके महाविद्यालय, धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील आश्रम शाळा, आष्टी येथील शाहू महाराज निवासी मूक बधीर विद्यालय, पाटोद्यात जामिया इस्लामिया बहार उलूम मदरसा, शिरूरमध्ये आयडीयल इंग्लिश स्कूल, केज येथे श्री विश्वनाथ कराड महाविद्यालय, वडवणीत बन्सीधरराव मुंडे इंग्लिश स्कूल या ठिकाणी क्वारंटाईन केले जाणार आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण होताना या व्यक्तीच्या अ‍ॅन्टीजन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट घेतल्यानंतरच त्यांना सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. शिवाय या संस्था तातडीने आवश्यक त्या कर्मचार्‍यांसह ताब्यात घ्याव्यात असेही तहसीलदारांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Tagged