acb office beed

शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक पकडला!

बीड


बीड दि.29 : वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकालाच मुख्याध्यापकाने लाचेची मागणी केली. 2 हजार 700 रुपयांची लाच स्वीकारताना बीड एसीबीने लाचखोर मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गेवराई पंचायत समितीत ट्रॅपची आठवड्यातली ही दुसरी घटना आहे.

भारत शेषेराव येडे (वय -57, व्यवसाय नौकरी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मण्यारवाडी ता. गेवराई) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. 2 हजार 700 रुपयांची लाच स्विकारताना गेवराई शहरातील चहापाणी अमृततुल्य हॉटेल येथे सोमवारी (दि.29) रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे शिक्षक आहेत. त्यांना चटोपाध्याय /वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अटी व शर्ती नुसार मान्य केले. संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे असे पत्र काढले होते. त्यावरून तक्रारदार यांचे वरील वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलाची रक्कम 27 हजार रुपयांचे 10 टक्के प्रमाणे 2 हजार 700 रुपयांची लाचेची पंचासमक्ष लाचेची मागणी केली, लाच रक्कम 2 हजार 700 रुपये स्वतः स्वीकारले. यावेळी भारत येडे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यारंभ ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी शेख युनूस, सह सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड, पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे यांनी केली.

Tagged