राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

‘हे’ आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

बीड : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे.

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यासाठी राज्यातील सर्व पक्षीयांकडून केंद्रावर दबाव टाकण्यात आला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी स्वतः कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. त्यानंतर काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Tagged