गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्याने तिच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्या पिलासह तिचा मृत्यू झाला. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून निवडून आलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले आहे. मनेका गांधी म्हणतात राहूल गांधी त्याच भागातील आहेत. त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही? ते शांत का? वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे मेनका गांधी यांनी ‘एनआयए’शी बोलताना म्हणाल्या आहेत.
