narendra modi

कोरोना लसीबाबत नरेंद्र मोदींनी दिली महत्वाची माहिती

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर मोदींनीही कोरोना लसीबाबतची भारतातील सद्य स्थितीची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन लसी विकसित करण्यात आल्या आहेत. त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. करोना व्हायरसवरील लस प्रत्येकाला मिळाली पाहिजे, हे सरकार सुनिश्चित करेल, असे आज मोदींना देशाला संबोधीत करताना सांगितले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, करोना व्हायरसच्या लसीचे उत्पादन आणि वितरणाचा आराखडा ठरला आहे. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे प्रत्येक भारतीयाला ही लस मिळेल. शास्त्रज्ञांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मोठया प्रमाणावर करोना लसीचे उत्पादन सुरु होईल, असे मोदींनी सांगितले.

Tagged